आधी धन्यवाद ! माझी बाजू जास्त मुद्देसूदपणे लावून धरल्याबद्दल. आणि....
आपल्या दारावरून आपलीच अंत्ययात्रा आगरकरांना बघावी लागली होती. असो. मुद्दा महत्त्वाचा.
मनीषा आपल्या प्रतिसादावर ऋचाने उत्तरे दिली आहेतच त्यामुळे मी आणखी काही म्हणत नाही पण,
महिला दिन साजरा केला म्हणून कोणी स्वतःला वेगळं काढून घेतलं असं समजणे बरोबर नाही.
का? असा पुरुष दिन साजरा होतो का?
व्यक्ती म्हणून, घटना म्हणून जे वेगळं, विशेष आहे त्या व्यक्तीची, घटनेची आठवण म्हणून, त्याविषयीची जाणीव म्हणून, कृतज्ञता म्हणून असे दिन साजरे केले जातात.
"मातृ-दिन", " पितृ-दिन " साजरा करतो म्हणजे काय त्यांना समाजापासून वेगळे काढतो का?
माझा ह्यालाही विरोध आहे. आपल्या जन्मदात्यांविषयी आपणच व्यक्त करायच्या भावनांसाठी आपल्याला विशिष्ट दिवस कशाला लागतो? हे दिवस साजरे करणं नवीन फॅड आहे. परदेशी संस्कृतीतील प्रथांचे अंधानुकरण कशासाठी?
लता मंगेशकर, मेधा पाटकर या सारख्या कर्तुत्ववान व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत ध्येय गाठतातच परंतु स्त्रियांसाठी ध्येयाचा मार्ग जास्त खडतर असतो ही खरी गोष्ट आहे.
मुळात ध्येयाचा मार्ग कुणासाठीही खडतरच असतो.
मेधा पाटकर, लता मंगेशकर इ. व्यक्ती मोठ्या होतात तर आम्ही तुम्ही का नाही? त्यांना ईश्वरी देणगी वगैरे आहे असे आपण मानू. मग आपल्याकडे ईश्वराने पाठ फिरवली आहे काय?
ऋचाने म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या अनेक अनिष्ट चालिरितींविरोधात आवाज उठवले गेले, त्यांच्यासाठी ध्येयाचा मार्ग खडतर नव्हता? ते लोक आपल्यासारखे रडत बसले? माझा अमुक अपमान झाला, माझा तमुक अपमान झाला म्हणून? काहीही झालं तरी ध्येयाप्रत लढत राहिलेच ना?
संघर्ष अपरिहार्य आहे ! मग तो कुणीही असो. ह्या जगात कष्टाशिवाय कुणालाही काहीही मिळणार नाही. त्यातून एखाद्याची मानसिकता बदलून क्रांती वगैरे घडवायची असेल तर संघर्ष, कष्ट अपरिहार्यच. हां! त्याच्या तीव्रतेत फरक असू शकेल. पण म्हणून तो कुणा एका घटकासाठी जास्त किंवा कमी अशी तुलना नक्कीच करता येणार नाही.