श्री. क्षीरसागर आणि श्री. जोशीसाहेब, तुम्ही खुप छान समजवून सांगता.

आणखी एक शंका.

डॉलर घसरतोय असं म्हटलं जातयं. पण रोज मी इथे बघतो, डॉलरला ५० रुपयांपेक्षा जास्त असा दर होत चाललय. हे कळलं नाही.

मागे तेल उत्पादक देशांनी डॉलरऐवजी इतर चलनात व्यवहार करायला सुरुवात केल्याचे वाचले. त्याचा हा परीणाम आहे का ? भविष्यात डॉलरला कोणिही विचारणार नाही असे होइल का ?

रुपयाची (किंवा इतर चलनाची किंमत) जशी १९३५-३६ च्या दरम्यान १ डॉलर = ४०,००० जर्मन मार्क झाली होती तसं काही घडेल का ? कारण इथे कोरीअन वोन झपाट्याने घसरतोय. आज तो १ डॉलर = १००० वोन पासून १५०० वोन पर्यंत आला आहे. यावेळी जवळ डॉलर ठेवणे योग्य आहे की कोरिअन वोन ?