यांची एक भारी आठवण आठवली.

गोव्यात मंगेशी गावाजवळ स्वामी ब्रह्मेशानंदांची एक तपोभूमी (आश्रम) आहे. तिथे डिसेंबर २००४ मध्ये "बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद" भरली होती. त्याच्या समारोपाला मुख्यमंत्री पर्रीकर येणार होते.

समारोपापूवीच्या परिसंवादात डॉ. पंकज चांदे बोलत असताना पर्रीकर एक शेवाळी रंगाचा डेनिमचा शर्ट आणि कॉटन जीन्स अशा पेहरावात शून्य सुरक्षा रक्षकांसह सामान्य प्रेक्षकासारखे कुठेतरी दुसऱ्या तिसऱ्या रांगेत येऊन बसले.

महाराष्ट्रातल्या थोर विद्वज्जनांनी त्यांना ओळखलेच नाही. आम्हा काही स्वयंसेवकांनी बातमी व्यासपीठाच्या मागे पोचवली तशी सूत्रसंचालक आणि वक्ते यांची अक्षरशः भंबेरी उडाली.

नंतर भाषण करताना त्या भंबेरीचा खुबीने विनोदात उल्लेख करून पर्रीकरांनी अभूतपूर्व हशा आणि टाळ्या मिळवल्या. उमदा मुख्यमंत्री असावा तर असा असं वाटून गेलं.