आपल्या जन्मदात्यांविषयी आपणच व्यक्त करायच्या भावनांसाठी आपल्याला विशिष्ट दिवस कशाला लागतो? हे दिवस साजरे करणं नवीन फॅड आहे.  परदेशी संस्कृतीतील प्रथांचे अंधानुकरण कशासाठी?

आपल्या जन्मदात्यांविषयी भावना व्यक्त करण्याचा एखादा दिवस असला तर काय बिघडते? रोज कोणी आई-वडिलांसाठी वेगळे करतेच असे नाही. एखाद्या दिवशी ठरवून केले आणि सर्वांनीच आनंद घेतला तर चांगलेच आहे की. जसे आपला यासाठी विरोध आहे तसेच याला पाठिंबा देणारेही हजारो लाखो लोक आहेत हे कृपया मान्य करून घ्यावे. यामुळे विरोधाची धार कमी होईल. कोणताही दिन सनदशीर रित्या साजरा करणे हा गुन्हा नाही, अनैतिक नाही किंवा समाजाला हानीकारक नाही.

मातृदिन ही परदेशी प्रथा नाही. पिठोरी अमावास्येचा दिवस आपल्याकडे मातृदिन म्हणून साजरा होतो. न जाणो उद्या पाश्चिमात्य, आम्ही पौर्वात्य प्रथा उचलून आणली असे म्हणतील.  

आपल्याकडे बैल पोळाही साजरा होतो. या एकाच दिवशी बैलांचे लाड होतात. वर्षभर त्यांचे लाड व्हावेत, त्यासाठी वेगळा दिवस नसावा हे खरेच आहे, पण तसे सहसा होत नाही हे याहूनही मोठे सत्य आहे. :) तेव्हा, असे दिन वगैरे साजरे करणे ही केवळ परदेशी प्रथा नाही. फारतर, पिठोरी अमावास्येचा दिन विसरून ८ मार्च लक्षात राहतो असे म्हणता येईल.

पुरुष दिन साजरा होतो का?

असा काळ लवकरच येवो.  ह. घ्या.

आता मूळ लेखाविषयी -

मनिषा, यांनी बहुधा लेखातून त्यांचे अनुभव किंवा त्यांच्या आसपासच्या स्त्रियांचे अनुभव मांडले असावेत. ते सर्वस्वी चुकीचे वाटले नाहीत. ऋचा यांचा प्रतिवादही योग्य वाटला. मनिषा यांचे काही संदर्भ चुकल्याचे जाणवले, याचबरोबर या लेखात वादासाठी वाद होतो आहे असेही जाणवले. अर्थातच, हे माझे निरीक्षण. चू. भू. दे. घे.

असो.