बरोबर, गार्गी-मैत्रेयीत तोच कांदिवली-बोरिवलीसदृष घोटाळा आहे.
याज्ञवल्क्याची पहिली पत्नी कात्यायनी असावी. दुसरी पत्नी मैत्रेयी. याज्ञवल्क्याने संन्यास स्वीकारण्यापूर्वी दोन्ही बायकांना आपल्या आश्रमाचा आणि संपत्तीचा समसमान वाटा दिला पण मैत्रेयीने तो नाकारला - मला ऐहिक गोष्टी नकोत तर चिरंतन असे काही मिळावे अशी मागणी केली अशी काहीशी गोष्ट आहे. शेवटी, याज्ञवल्क्याने तिला आपल्या सोबत येण्याची परवानगी दिली आणि कात्यायनीने त्यांच्यामागे आश्रम व्यवस्था पाहिली. चू. भू. दे. घे.
दैवराती जनकाने वादविवादात जिंकणाऱ्यासाठी हजार गायी बक्षिस ठेवल्या होत्या. याज्ञवल्क्याला आपण वादविवाद जिंकू असा अभिमान होता. तेथे गार्गीच्या एकामागोमाग एक येणाऱ्या प्रश्नांनी तो नामोहरम झाला अशी काहीशी गोष्ट आहे. कदाचित, गायी हातातून जातील म्हणून वैतागून म्हणाला असावा. गार्गीच्या जागी पुरूष असता तरी असेच म्हणण्याची शक्यता आहे. गार्गीही वचक्नु ऋषींची कन्या असल्याने तिला वाचक्नवी असे म्हटले जाते ना!