३. संकेतस्थळावरून निवडणुकीचा प्रचार यशस्वी होवू शकतो ?
नक्कीच. अगदी प्रचंड यशस्वी होऊ शकतो. बराक ओबामा ह्यांच्या निवडणुकीतील यशात संकेतस्थळांवरील प्रचाराचा मोठा वाटा आहे. ह्यांसदर्भात "हाउ ओबामाज इंटरनेट कँपेन चेंज्ड पॉलटिक्स"१ हा लेख वाचनीय आहे. अर्थात भारतातली परिस्थिती वेगळी आहे. किती वेगवेगळ्या भाषांत संकेतस्थळे उभारावी लागतील. (ही वेबव्यावसायिकांसाठी आणि कंटेट डेवलपरांसाठी चांगली संधी आहे.) तसेच भारतात इंटरनेटचा वापर अमेरिकेच्या मानाने काहीच नाही, असे वाटते.
दुवा क्र. १