"शुभ बोल नाऱ्या " हा वाक्प्रचार की म्हण या फंदात पडत नाही, पण ही इच्छा सर्वांचीच, अगदी चोरांची सुद्धा. सुविचारांचे प्रसारण नक्कीच नवीन सुविचारांना प्रसवते, सुविचारांना जोड सु-उच्चारांची व सु-कर्मांची असेल तर ते सुविचार, फक्त सुविचार न राहता " आशीर्वाद " बनतात व नक्कीच फळतात देखील. सुविचारांचे प्रसारक, त्यासाठी विचाराने, उच्चाराने व कर्माने किती " सु" हे निसर्ग आधी पडताळून पाहतो. नंतर त्या त्या शुद्धते नुसार तसे, तेवढे प्रसवतो.
शाप / श्राप म्हणजे काय हे उपरोक्त वर्णनाच्या आधारे सर्वांना ज्ञात होण्यासारखेच आहे. ते शक्यतोवर टाळावे.
बाकी देशमुख साहेबांचे विशेष आभार. अशा सकारात्मक सहाभागांची खुप आवश्यकता प्रत्येक समुहात असतेच.
सर्वांना शुभ प्रसारणाची प्रेरणा होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना व हीच शुभेच्छा!