तुमच्या प्रतिसादात तुम्ही म्हटलेलं मकौलेचं पत्र 'मकौलेज मिनट (macaulay's minute)' या नावानं जालावर सर्वत्र उपलब्ध आहे. गुगलवर मकौलेज मिनट टाका म्हणजे त्वरित मिळून जाईल.
अवांतरः तुम्ही उद्धृत केलेली वाक्यं असलेला उतारा मूळ मकौलेज मिनट मध्ये खरंच होता का नाही या बद्दल अभ्यासकात एकमत नाही आणि हा उतारा त्यात नव्हता आणि नंतर घुसडण्यात आला होता असं मानायला हरकत नसावी इतपत पुरावे उपलब्ध आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मकौले हा ब्रिटीश अधिकारी प्रचंड विद्वान आणि मुत्सद्दी होताच पण तितकाच उद्दाम आणि भारतीयांचा द्वेष करणाराही होता. त्याच्या याच मिनट मध्ये त्यानं पुढं असंही म्हटलंय की "भारतीय आणि अरेबिक साहित्यसंपदा युरोपातल्या कुठल्याही चांगल्या लायब्ररीतल्या एका शेल्फापेक्षा जास्त नाही. " (! ) मकौलेच्या अशा प्रकारच्या दर्पोक्त्यांमुळे निदान भारतात तरी त्याचं नाव फार चांगल्या संदर्भात घेतलं जात नाही.