मी कदाचित चुकत असेन पण मला असं वाटतं की प्रामाणिकपणा आणि संस्कार यांचा संबंध बहुतेक त्या देशाच्या आर्थिक सुबत्तेशी असेल.  म्हणजे तुम्ही बघितलंत तर जगातल्या प्रत्येक गरीब देशात प्रामाणिकपणाचा प्रश्न आहेच.  त्यामुळे अशा देशांमध्ये तीव्र जीवन संघर्षाला  (बेकारी, स्पर्धा आणि गरिबी) तोंड देण्यासाठी  आई बाप प्रामाणिकपणा बासनात गुंडाळून ठेवत असतील. (का लोक प्रामाणिकपणा बासनात गुंडाळून ठेवतात म्हणून तो देश कधी सुबत्ता बघू शकत नाही?) 

मुलांवर वातावरणाचे संस्कार जास्त खोलवर रुजतात.  अर्थातच मुलं अशाच वातावरणात जर वाढली की जिथे जीवन संघर्ष तीव्र आहे आणि त्यामुळे आई बाप पैसे खातात किंवा चोऱ्या करतात किंवा कुठच्याही प्रकारच्या व्यभिचारात असतात, तर तिथे मुलांवर काय संस्कार होणार हे उघड आहे आणि ही मुलं मोठं झाल्यावर काय करणार हेही उघडच आहे.