माझ्या लग्नापुर्वी साधारण दिड वर्षाआधी मी ही कथा लिहिली होती. ह्या कथेतील घाटंजी, माझे आई-वडिल, नंदुभाऊ व वहिनी, मैथिली आणि रवी हे सगळे खरे पात्र आहेत. श्रुती आणि तिचे वडिल तसेच माझ्या सर्व मैत्रीणी हे काल्पनिक पात्र होते.
त्यावेळी वाटले नव्हते, की अश्याच थोड्या फार फरकाने मला माझी श्रुती मिळेल. माझी माझ्या सौ.शी झालेली भेट आणि त्यानंतरच (आणि लग्न ठरण्यापुर्वीचं ) प्रेम हा वेगळा लेख होईल. असो.
माझ्या सौ. ला माझी बहिण ७-८ वर्षांपासून ओळखत होती, तर माझा भाचा तिला शितलताई म्हणायचा. आता तो तिला मामी म्हणतो.
सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भुत असतं ते काही खोटं नाही.
सर्व प्रतिसादांबद्दल खुप खुप धन्यवाद !