स्वामीजी एकदा युरोपात असतांना (किंवा अमेरिका, नक्की आठवत नाही) एकाने त्यांना प्रश्न विचारला होता,
" हे जग म्हणजे एका संत्रासारखे आहे. तुम्ही जितक्या लौकर त्याचा उपभोग घ्याल तितके उत्तम"
त्यावर स्वामीजी म्हणाले, " जग संत्रासारखे नाही. ते कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहिल. तसाच मीही आहे, काल होतो, आज आहे आणि पुढेही राहिन. त्यामुळे मला कसलिही घाई नाही. "
माझ्या मते, ही घाई पाश्चिमात्य देशात जास्त आहे, तर पौवार्त्य देशात कमी. भौतिक सुखाला अधिक महत्त्व देणारे ते पाश्चिमात्य तर आध्यात्मिक सुखाला महत्त्व देणारे ते पौवार्त्य, असं ढोबळमानाने म्हणता येईल.
मात्र आता जगात स्थित्यंतर होतय. "घर कि मुर्गी... " अश्या न्यायाने पुर्वेकडिल देश भौतिक सुखाच्या मागे लागत आहेत तर आध्यात्मिक उन्नतीसाठी पश्चिमेकडिल देश ..... अर्थात सर्वच नाही पण बऱ्याच प्रमाणात ....