माझ्यामते निसर्गवर्णन हा जरी कवितेचा विषय घ्यायचा असला तरीही फक्त निसर्गातील विविध छटा लिहून कविता सशक्त होते असे नाही.
दोनपैकी एक गोष्ट असावी असे माझे मत!
१. काव्य - कवितेत काहीतरी काव्य असले पाहिजे. ( काव्य याचा अर्थ मी पद्य म्हणत आहे असा कृपया घेऊ नये. )
किंवा
२. प्रतिमा असाव्यात. जसे आपण म्हंटले आहेत की तळ्याला कधी एकदा वाफ होऊन बाहेर पडतोय असे वाटावे. इथे जर एखाद्या सासरच्या जाचाला कंटाळलेल्या स्त्रीला 'तळे' समजए तर तिचा भाऊ आल्यावर तिला कधी एकदा सुटतोय अन माहेरी जातोय असे वाटेल. अर्थात आपल्याला ते तसे म्हणायचे होते की नाही माहीत नाही. पण जर आपल्याला 'तळे' म्हणजे 'तळे'च म्हणायचे असेल तर आपण फक्त तळ्याला एक मन देण्याची कविकल्पना केलेली आहेत असे खेदपुर्वक म्हणावेसे वाटते.
तळे अन साचलेला पाऊस सोडले तर या रचनेत आकर्षणाची स्थळे कमी आहेत असे म्हणावे लागेल, असे माझे मत आहे.
धन्यवाद!
आमची सही - आक्रोश का असेना पद्यामधे बसावा - जगणे मला कधीही जमलेच गद्य नाही.