राम राम त्रासजी,

३६० अंशात्मक शिक्षण किती शाळांमधून मिळते? हा वादविवादाचा चर्चेचा विषय ठरू शकतो. ते तसे व्हावे या दृष्टिने आपल्या सुचना छान आहेत, त्या किती व्यवहार्य [ भारतात ] ते मोजमाप करावे लागेल.

हे ब्लूम्स टॅक्सॉनॉमी कळाले नाही.

मनोगतावर, माझ्या इंग्रजाळलेल्या मराठीला समजण्यासाठी , वाचकांना शब्दकोष शोधावा लागुनये व तीला जास्तीत जास्त  सुगम मराठी करण्यासाठी मी, दुवा क्र. १

या इंग्रजी -- मराठी , कधी कधी इंग्रजी--  हिंदी शब्दकोषाचा पुरेपूर वापर करतो. आधी आचरले मग सांगीतले असे आमचे तत्त्व असल्याने ते तुम्हास सांगण्याचे धाडस करत आहे, बाकी तुमची मर्जी.

बाकी शिक्षकाचे सुद्धा असेच अनुभव सिद्ध ज्ञान विद्यार्थी आनंदाने स्विकारतील अशी एखादी सुचना यात भर घालावी वाटते.

आपण "मुल्यशिक्षण"  या बद्दल काहीच लिहिले नाही, त्याबद्दल एखादे ऍडेंडम --पुरवणी / परिशीष्ट याच लेखात टाकायला हरकत नाही.

पुर्वी गुरुकुल पद्धतीत, विद्यार्थी हा गृहस्थाश्रमापासून संपुर्णतः विलग अलग वेगळा असायचा, त्याचे लक्ष्य केवळ ३६० अंशात्मक शिक्षण एवढेच असायचे त्यामुळे त्याची एकाग्रता सहज साध्य व्हायची व साहजिकच त्याची वैयक्तीक गुणवत्ता बहुसहस्त्र पटीने [ आजच्या पेक्षा] जास्त असायची. तश्या प्रकारची शिक्षणव्यवस्था जर कोणी इम्युलेट--- कॉपी करू शकेल तर ती जास्त फायद्याची ठरणार नाही का?

त्याचा मला उमगलेला एक अति महत्त्वाचा फायदा असाः कठोर शारिरीक श्रमासोबत विद्येचे + कलेचे ग्रहण [मेंदुद्वारे] चाललेले असायचे. म्हणजे ज्याला आपण मानसशास्त्रात कंडिशनींग ---- कठोर काळातील / दुष्काळातील स्थीतीचे मानस सुदृढीकरण असे म्हणू या, ते चालायचे. त्यामुळे, या विद्येचा + कलेचा परम उपयोग त्या विद्यार्थ्यावर कठीण प्रसंग येताच आपोआप मेंदूने स्वयंचलीत [ऑटोमॅटिक ट्रिगर बाय माईंड ]  उत्कृष्ठ पद्धतीने सुरुव्हायचा ,चालायचा. म्हणजे ज्या एकुण परिस्थितीत एखाद्याचे गलितगात्र व्हावे तशाच परिस्थितीत अशा तरबेज शिष्यांची मनोकाया एखाद्या यंत्रवत सुरळीत चालायची.

उदाः  जसे रामावर वनवासाचे संकट येताच त्याचा वनवास व वनवासाचे अंतीम ध्येय म्हणजे रावणवध हे त्याचे गुरू श्री. अगस्ती मुनी यांनी शिकविलेल्या ज्ञानाचा [विद्या + कला ] परिपाक / कस लावता लावता, सुकर झाले. आशा करतो की मुद्दा कळाला असेल.

हे शिक्षणाचे मुलतत्वः शारिरीक कठोर श्रम + विद्या/कला ग्रहण हे कोणत्याही शिक्षणाचा / प्रशिक्षणाचा गाभा असावा असे नाही का तुम्हाला वाटत?

धन्यवाद.