'रामायण' लिहीले गेले ते रामाला 'हीरो' बनविण्यासाठी लिहीले गेले नव्हते. (महाभारात ही) त्या लिखाणा मागे मानवी आयुष्यात कसे-कसे बदल घडू शकतात, कशा-कशा मुळे बदल घडू शकतात ह्या गोष्टींच मार्गदर्शन केले गेलेले आहे असं मी समजतो. काळ बदलत असतो. बदलत्या काळाचे नियम वेगवेगळे असतात. ते एक अगम्य कोडंच असतं. त्या-त्या व्यक्तीसाठी ती एक परीक्षा असते असं म्हणू शकतो.

प्रत्येकाचा जीव कशात ना कशात तरी अडकलेला असतो. वडीलांच्या आयुष्याचा मुलांच्या आयुष्यावर परीणाम होतोच. राम अयोध्येचा राजा त्याचे वडील दशरथ जीवंत असतानाच होवू शकला असता का? हा प्रश्न जर उभा केला तर?...

'स्त्री शी संग  वा प्रणय' ह्या विषयाचा गुंताच रामाच्या आयुष्यात त्या युगात बदल घडवतो / घडवला असावा. ते युग वेगळे होते. प्रत्येक भौगोलिक प्रांतावर स्वतःच (आध्यात्मिक दृष्टीकोनातून) एक वलय आपला प्रभाव ठेवत असावे. आपल्या राहत्या स्थानाची वेस ओलांडल्यावर आपण दुसऱ्या वलयात नकळतपणे प्रवेश करीत असतो. त्या वलयाचे नियम वेगळे असतात. त्या स्थानावर त्या वलयाचे नियम पाळूनच आपले अस्तित्व टीकवायचे असते.

दंडकारण्य ह्या विभागात कदाचित 'जेव्हा एखादी स्ती, तीला आवडलेल्या पुरुषाकडे 'प्रणय प्रस्ताव' ठेवते, तेव्हा पुरुषाने तो प्रस्ताव अव्हेरू नये.' असा नियम असावा. 

शूर्पणका रामावर आरक्त झाली व तिने आपला प्रस्ताव मांडला. रामाने आपण विवाहीत असून पत्नी सोबतच आहोत असे सांगून लक्ष्मणा कडे पाठवले. लक्ष्मण ह्या विषयातला नक्कीच खुळा होता. (म्हणूनच तो आपल्या 'दादा' सोबत येवून आपल्या बायकोला मागे ठेवून आला) त्याने स्त्रीच्या भावनांचा आदर केला नाही. त्याची (प्रतिसाद नव्हे) प्रतिक्रीया होती तिचे नाक-कान कापण्याची! त्या भौगोलिक प्रांतातील आध्यात्मिक वलयाचे तिथं उल्लंखन झाले, त्यातून नव-नवे परीणाम (अ कॅस्केडींग इफेक्ट) उत्पन्न झाले.

अरण्यात असताना रामाने सीतेशी संग केले नसावे. कारण तसे झाले असते तर 'खुळ्या' (व अनुकरणप्रिय) लक्ष्मणाकडून भलतीच चूक झाली असती. ही घटना टळली ती रामाचा स्वतःवर प्रचंड ताबा होता म्हणूनच...! भावा-भावात 'प्रेमा'साठी भांडण झाले असते.

सगळ्या गोष्टी चमच्याने भरवता येत नाहीत.

रामायण असो वा महाभारत, बायबल असो वा कुराण त्यात काय लिहीलय? ते का लिहीले गेले आहे. ह्याचे ठोकताळे कसे काय बांधायचे? महाभारत ही प्रणया भोवतीच, वेगवेगळ्या आध्यात्मिक नियमांभोवतीच बेतलं गेलं आहे ना? मग असे असताना त्यातील पात्र, नायक मला आवडला नाही असं म्हणणं हे अगदीच बालीश नाही का?