पुलस्तिसाहेब,

आपल्या सर्व मतांचा पूर्ण आदर!

चर्चा चालू राहावी व माझी विचारसरणी ब्रॉड व्हावी म्हणून मनातली एक शंका उपस्थित करत आहे, कृपया गैर मानू नये.

 ऑब्जेक्टिव्ह कंटेट जर निसर्गवर्णन असेल , म्हणजे, कवीने जे शब्दात मांडले असेल तेच कवीला म्हणायचे असेल, त्यापलीकडे काहीही म्हणायचे नसेल ( जसे तळे म्हणजे सासुरवाशीण, आपण स्वतः वगैरे ) तर इतरांनी ( रसिकांनी ) आपापल्या मगदुमाप्रमाणे त्यातून वेगवेगळे अर्थ लावणे याचे क्रेडिट माझ्यामते कवीला किंवा कवितेला देता येणार नाही.

आपण म्हंटल्याप्रमाणे सापेक्ष अनुभुती व उघड अर्थांच्या शक्यतांनी कविता बनणे हे अर्थातच पटण्यासारखे आहे. पण माझ्यामते 'सापेक्ष अनुभुती' हा भाग पूर्णपणे रसिकावर व रसिकाच्या रसिकतेवर / क्षमतेवर अवलंबून असल्यामुळे एखादी रचना समाजापर्यंत पोहोचली की ती आवडण्याची / न आवडण्याची भिन्न कारणे निर्माण होऊ शकतात. पण आपण आपली रचना जर समाजापर्यंत पोहोचवत असलो तर मुळात ती ऑब्जेक्टिव्ह कंटेंटनेच किंवा आपल्याला अभिप्रेत 'हिडन अर्थानेच' आवडावी याचा प्रयत्न करणे किंवा त्यात यशस्वी होणे हे माझ्यामते कविता समर्थ होण्याचे निदर्शक मानले जावे.

 नकळत एखादा सुंदर सूर छेडला जावा अन हेतूपुरस्पर तो छेडावा यात फरक मानला जावा असे माझे मत आहे. तसेच, लावलेला सूर कसा वाटतो आहे हे रसिकावर सोडणे यापेक्षा तो सूर लावताना आपल्याला आवडले की नाही हे पाहिले तर सूर युनिव्हर्सली आवडण्याची शक्यता वाढावी.

बाकी - काही वेळा रसिकच असा असतो ली त्याच्या विचारसरणीच्या प्रेमात पडावेसे वाटते, जसे आपला वरील प्रतिसाद पाहून मला वाटत आहे.

सन्माननीय कामिनीजी - आपल्या परवानगीशिवायच मी चर्चा लांबवत आहे यासाठी क्षमस्व! पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी एखाद्याला बरे वाटावे म्हणून खोटी स्तुती करणार नाही. अर्थातच ज्यांनी आपल्याला पॉझिटिव्ह प्रतिसाद दिले आहेत ते आपली खोटी स्तुती करत आहेत असे मला म्हणायचे नाही. त्यांच्या मतांचा पूर्ण आदरच आहे. पण, पुलस्तिसाहेबांचा प्रतिसाद मला आपल्या कवितेपक्षा जास्त आवडला हे सत्य मी लिहिलेच पाहिजे.

धन्यवाद!