आजच्या रंगलेल्या चर्चेत एका जुन्या चर्चेचा समावेश झाला आहे, 'पाश्चिमात्य शब्द..... ' त्याला मी प्रतिसाद दिला म्हणून एक प्रतिसाद वाढून ती चर्चा मुखपृष्ठावर आली आहे.  

त्यामुळे जुन्या चर्चेला सरळ प्रतिसाद दिलात तर ती चर्चा "रंगलेल्या चर्चां"मध्ये समाविष्ट होते. अर्थात त्या चर्चेला देण्यात येणारे प्रतिसादांची संख्या कमाल संख्येपेक्षा जास्त झाली तर प्रशासक त्या चर्चेला तिथेच थांबवतात आणि नवीन पानावर चर्चा सुरू करण्याचे आवाहन करतात.

जुन्या विषयात नवीन भर पडली असेल तर नवीन चर्चा सुरू करणे योग्य असं मला वाटते. तसेच जुन्या चर्चेत खुप जास्त किंवा खुप कमी प्रतिसाद असतील तर नवीन पानावर चर्चा सुरू करणे योग्य असं मला वाटतं. कारण त्यामुळे नवीन मनोगतींना त्यामुळे लिहायचा हुरुप येतो आणि नवीन मतंही कळतात. त्यात मीही एक आहेच  

तुमच्या प्रश्नांमुळे मलाही ह्या गोष्टी कळल्या, त्याबद्दल धन्यवाद.