जर राम देव नव्हता, केवळ एक राजा होता, असं म्हटलं कि मग तो 'आदर्श' होता कि नाही याबाबत आपण चर्चा करण्यात अर्थ नाही. कारण चुका प्रत्येक मनुष्य करतो, आणि रामही मनुष्यच होता. असो.
माझ्या मते, राम हा एक आर्य संस्कृतीतला राजा तर रावण हा द्रविड संस्कृतीतला राजा होता. आणि रामायण हे उत्तर भारतातील वाल्मिकी नावाच्या लेखकाने लिहिले आहे, त्यामुळे त्यात रामाचे साहजिकच 'आदर्श' आणि रावणाचे 'दुष्ट' असे चित्र रंगवले गेले आहे. त्यामुळे रामयणाला आर्य आणि द्रविड संस्कृतीतील संघर्ष असं बघितलं तर अधिक योग्य होईल असं वाटतं.
बाकी काही असो, रामाने वडिलांना दिलेला शब्द पाळला, हे ही काही कमी नाही. आजकाल कोण बापाचं ऐकतो
भरताला त्याने राजा करायचे ठरवले होते, पण भरताने नकार दिला. पण वचन पाळायचे म्हणून 'स्वतः' च्या नावाने राज्य कर, असं म्हणत राज्य केलं.
बालीबद्दल मला माहीती नाही.
शुर्पणखा ही राक्षस होती, तिचे नाक लक्ष्मणाने कापले, कारण तिने त्याला लग्नाची मागणी घातली होती. ती अनार्य (द्रविड) म्हणून त्याने नाकारले असावे. त्याचा बदला म्हणून रावणाने सीतेला पळवले.
बाकी मला कृष्ण रामापेक्षा उजवा वाटतो कारण दैनंदीन व्यवहारात तोच कामात पडतो. 'राम' हे अतिआदर्श'वादाचं प्रतिक आहे, पण बापाच्या इच्छेखातर राज्याचा त्याग करणे आणि १४ वर्ष वनवासात काढणे, मला कौतुकास्पद वाटते.
अवांतर :- त्याग कोणाचा ? सीतेचा की लक्ष्मणाच्या बायकोचा, उर्मिलेचा ? भीमराव पांचाळेंच्या गझलेतील ओळ आठवली. असो.