आपल्या मताशी सहमत. खरे तर आदर्श कुणीच नसतो. प्रत्येकात काही ना काही गुण दोष असतातच. एकदा एखाद्याला आदर्श मानले की  त्याच्याकडे व्यवहारीपणे बघणे संपते. त्याने काहीही केले तरी ते बरोबरच असे वाटते.

रामाच्या सीतेशी वागणुकीबद्दल,

माझ्या मते कोणत्याही सामान्य माणसाने अथवा तत्कालीन राजाने हेच केले असते. सीता एक वर्ष दुसऱ्या राज्यात होती. रावणाने तिचा उपभोग घेणे यात अशक्य काहीच नव्हते. अग्निपरीक्षा ही जादू, चमत्कार आहे. असे चमत्कार कोणत्याही काळात होत नव्हते हे तर सर्वमान्यच आहे. अशी कोणतीही जादू उपलब्ध नसताना रामाने कोणत्या पुराव्यांवर विश्वास ठेवून तिचा स्विकार करायला हवा होता?

दुसरे म्हणजे पुरावे कितीही असले तरी जी पत्नी एक वर्ष परपुरुषाबरोबर त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या ठिकाणी असताना, तत्कालीन समाजाची मानसिकता लक्षात घेता बायका पळवणे व उपभोग घेणे यात विशेष असे काहीही नव्हते. (उदा. वाली-सुग्रीव भांडणे) अशा परिस्थितीत रामाला तिच्या चारित्र्याबाबत शंका येणे सहाजिक वाटते. पुरावे असले तरी त्याचे मन त्याला खात असणारच.

हा अपघात होता. सीता स्वतः या गोष्टीला तयार झाली नसणार इतपत विचार रामासारख्याने करायला हवा होता. तसा तो त्याने केलाही असेल. पण राजाला वैयक्तिक मतापेक्षा प्रजामताचा विचार अधिक करावा  लागत असल्यामुळे त्याने प्रजेच्या मतानुसार वागायचे ठरवले असावे असे वाटते.