श्री मिलिंद फणसे साहेब,

दुर्दैवाने आपला गैरसमज झालेला दिसतो. मी हे खालीलप्रमाणे म्हंटले होतेः

७. गझलेमधील प्रत्येक शेर स्वतंत्रपणे एक काव्य असतो हे जरी सर्वमान्य असले तरी विषयाचा एक स्वभाव असतो. जसा माणसांचा स्वभाव असतो तसा. साधारण एकाच स्वभावाची माणसे एकमेकांशी मैत्री करताना सहजपणे करू शकतात तसे खूप भिन्न स्वभावाची माणसे करू शकत नाहीत. वेळ पाळणाऱ्यांची वेळेच्या बाबतीत निष्काळजी लोकांशी मैत्री होणे कठीण असते. तसेच शेरांचेही होते.   एकाच गझलेत प्रेम, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निवडणुका, माणसे सापापेक्षा विषारी असण्याचा उल्लेख, पाशिमात्य संस्कृतीचे अतिक्रमण वगैरे घेणे चांगले वाटत नाही.

मी असे कधीच म्हंटलेले नाही की एकाच विषयावर सगळे शेर असावेत. मग त्याला गझल कशाला म्हणायचे? मी शेरांच्या स्वभावाबद्दल लिहीत आहे.

धन्यवाद!