१. गझल ही खासगी स्वरुपाची असावी.
 - का ? ह्या विधानास काही संदर्भ (रेफरन्सेस)

३. गझलेमध्ये नाट्यमयता, मातृभूमी व आपल्या संस्कृतीची जाणीव होणारी शब्दरचना, विरोधाभास, उपमा, नाजूक शब्दांची निवड यावर भर द्यावा.
 - आपली संस्कृती म्हणजे नेमकी कोणती? 'संस्कृती' ह्या विषयावर यापूर्वी मनोगतावर अनेकदा रंजक व अंतहीन चर्चा (पक्षी : जोरदार भांडणे) झालेल्या आहेत. एकदा त्या नजरेखालून घालून मग 'आपली संस्कृती' म्हणजे कोणती/काय हे सांगाल काय? म्हणजे मग त्यानुसार आम्ही शब्दरचना व शब्दांची निवड करू शकू. मातृभूमीची मर्यादाही आजच्या काळात पटत नाही. पोटासाठी/शिक्षणासाठी जगभर विखुरलेले लोक जिथे स्थायिक झालेत त्या भूमीची जाणीव त्यांच्या गझलेतून येणे स्वाभाविक नाही काय? तसेच,'गझलमधील शेर विरोधाभासावरच आधारित असतात, ही समजूत पार चुकीची आहे" हे सुरेश भटांचे वाक्यही विसरू नये.

निकष ७.
 - ह्याविषयी वर दिलेला माझा प्रतिसाद पाहावा.