हा शब्दच्छल झाला.
विषयांचे वैविध्य किंवा संदर्भ किती असावेत याबाबत माझे मत असे आहे की गझल शक्यतो एका स्वभावाची किंवा वृत्तीची वाटावी.
हे वाक्य तुमचेच ना?
एकाच गझलेत प्रेम, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निवडणुका, माणसे
सापापेक्षा विषारी असण्याचा उल्लेख, पाशिमात्य संस्कृतीचे अतिक्रमण वगैरे
घेणे चांगले वाटत नाही.
का चांगले वाटत नाही? आणि नसेल वाटत त्याने गझल वाचू नये. वर म्हटल्याप्रमाणे कविता विपुल आहेत. तुम्ही मूळ मु्द्यास बगल देत आहात. गझलेत शेरागणिक विषय व भाव/मूड बदलण्याची मुभा आहे ही वस्तुस्थिती आहे, जरी ती तुम्हाला पसंत नसली तरी.