सुरेश भट साहेबांचे नाव घेतले की झाले असे करू नका. मी कुठेही म्हंटले नाही की 'गझलेत फक्त विरोधाभासच असावा'. आपण मुद्याला नवीन रंग देऊ नयेत अशी विनंती.
मी असेही म्हंटलेले नाही की संस्कृतीचा समावेश श्री चक्रपाणी यांच्या गझलेत झालेला नाही. मी फक्त तो एक निकष आहे असे म्हंटलेले आहे.
पुन्हा सांगतो, गझलेत विविध विषय असतात हे मला नुसते माहीतच आहे असे नाही तर ते मीही माझ्या गझलांमध्ये पाळतो. तेच तेच पुन्हा सांगण्यापेक्षा मी काय म्हणतो आहे याच्याकडे जरा कृपया लक्ष द्यावेत अशी विनंती.
एकाच गझलेत वाट्टेल ते वैविध्य असणारे विषय घेणे हे गझलेला हानी पोचवणारे व गझलेची कविता करणारे ठरू शकते.
पहाः
करीअर, ओव्हन, मृत्यू. मिणमिणते श्वास. विठ्ठल !
याच शेरातील मुद्दे मी एक गझल रचून त्यात वेगळ्या पद्धतीने मांडून दाखवतो. म्हणजे बहुधा लक्षात यावे.
अति प्रतिभावान नसल्यामुळे सुचायला लागतो तो वेळ द्यावात अशी विनंती!
( त्यात मी श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे असा गैरसमज करून घेऊ नयेत. फक्त मुद्याच्या पुष्ट्यर्थ मी तसे करत आहे. )
धन्यवाद!