संस्कृती म्हणजे काय हा प्रश्न तुम्ही सोयीस्करपणे अनुत्तरित ठेवत आहात. तेव्हा तीस निकष कसे काय मानायचे? चर्चा केवळ चक्रपाणिंच्या गझलेविषयी नसून गझल ह्या व्यापक विषयावर होत आहे.
एकाच गझलेत वाट्टेल ते वैविध्य असणारे विषय घेणे हे गझलेला हानी पोचवणारे व गझलेची कविता करणारे ठरू शकते.
?????? आजपर्यंत असेच वाचले-ऐकले होते की कविता एका विषयावर असते व उलगडत जाते, आणि गझलेतील शेर स्वतंत्र असतात, विविध विषय हाताळणारे असतात. मग "वैविध्य असणारे विषय" घेतल्याने गझलेची कविता कशी होते बुवा? तुम्ही गझलेची व कवितेची व्याख्या नेमकी उलटी करू पाहात आहात. आणि "वाट्टेल ते वैविध्य" हा शब्दप्रयोग समजला नाही. वैविध्यातही पोटजाती असतात हे ठाऊक नव्हते.
करीअर, ओव्हन, मृत्यू. मिणमिणते श्वास. विठ्ठल !
याच शेरातील मुद्दे मी एक गझल रचून त्यात वेगळ्या पद्धतीने मांडून दाखवतो.