पांघरायला विस्मरणांची झूल नको आता!
आठवायला काटे पुष्कळ! फूल नको आता
हा शेर तसाच घेता येईल.
हवे करीअर, हवे प्रमोशन, माडी अन गाडी
हवी 'मजा' प्रणयातसुधा, पण मूल नको आता
तुला सुबत्ता प्रगती माझी, प्रेम नको आहे
मीलन अपुले भोग अनैतिक, मूल नको आता
मिटक्या मारत गिळून घेताना ओव्हनमधले,
मऊभात, भाकरी...?... धूर अन चूल नको आता
परदेशी उपकरणाने शिजवून अन्न गिळतो
आई थापे भाकर ज्यावर चूल नको आता
लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो,
पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता
लपाछपीने नकोस माझी धार गंजवू मृत्यो
धीर जरा कर, समोर ये तू, हूल नको आता
गंधित वारा तुझ्या गावचा - पण मी गुदमरतो
(मिणमिणत्या श्वासास तुझी चाहूल नको आता)- हा शेर तसाच. याच्यात बदल करणे म्हणजे पायावर धोंडा पाडून घेणे आहे.
सुदैव माझे कुणी पळवले कुणास ना पत्ता,
उरलेलेही लुटायचे तर भूल नको आता!
लुटायचे ते लुटा मित्रहो विरोध ना माझा
खुलेआम पण लुटा, नाटकी भूल नको आता
मिठीत घे रे, कुशीत घे, विठ्ठला जरा आता
नाळ जिण्याशी घट्ट करे तो पूल नको आता
पुन्हा कामना जगण्याची तो जागवेलसुद्धा
जीवनास नेउन सोडे तो पूल नको आता
माझ्यामते जगण्यातली 'निराशा' हा या शेरांचा स्वभाव म्हणायला हरकत नसावी.
धन्यवाद!