माझ्या गझलेस / गझलेमध्ये संस्कृती नाही, या विधानास मी आक्षेप घेतो आहे. संस्कृतीचेच बोलणार असाल तर माझ्या गझलेमधले काही शेर ही आजची भोगी, अप्पलपोटी, जबाबदारीपराङ्मुख संस्कृती यांचे प्रतिनिधित्त्व करीत आहेत. ही कदाचित आपली समाजमान्य, अपेक्षित संस्कृती नसेलही आणि अशी 'संस्कृती' पाळणारा/असणारा एक मोठा वर्ग / मोठी पिढी समाजाचाच एक भाग आहे, हे दुर्दैव असले, तरी खरे आहे. माझ्या गझलेतील शेर अशा वर्गाचे आणि या वर्गासाठी करुणाभाव बाळगून असणऱ्यांचे प्रतिनिधित्त्व करतात, असा प्रतिवाद मी येथे करेन.
दुसरे असे की तुम्ही गझलेमध्ये स्वानुभवाचा अंतर्भाव असण्याबद्दल जे बोललात, तेच पुढे रेटून मी म्हणेल की आजच्या घडीला मी ज्या समाजाचा, ज्या भूभागाचा, ज्या संस्कृतीचा भाग आहे, त्या समाजाची, त्या भूभागाची ही संस्कृती आणि जीवनमान आहे, जे कदाचित मी अनुभवले आहे; पण तुम्ही नाही. सबब, माझी गझल संस्कृतीस धरून असलेली तसेच स्वानुभवसंपन्न आहे, असा दावा मी करतो.
धन्यवाद.