सुबत्ता, प्रगती वाल्या शेरामध्ये तुम्ही अर्थ बदलला आहे. प्रमोशन, करीअर, माडी नि गाडी यातून दिसू देत सुबत्ता, प्रगती वगैरे वाचकांना; नव्हे मला खात्री आहे ती दिसलीच आहे नि मला त्या ओळीतून काय सांगायचे ते कळलेही आहे. सुबत्ता, प्रगती असे सगळे मराठीच्या संदर्भासह स्पष्ट करा सारखे उलगडून कशाला सांगायचे? मी दिलेली यादी ही सुबत्ता, प्रगती यांचे पूरक रूपक/उदाहरणे आहेत नि ते पुरेसेच आहे. मूळ शेरात तुला-मला असे म्हटलेच नाही. माझ्या मते त्या शेरात कोणी असे म्हटले असेल / कोण असे म्हणत असेल, का हा विचार वाचकांवर सोडावा; तू-मी अपेक्षित नाही. ओव्हन ऐवजी परदेशी उपकरण हास्यास्पद आहे. कोणत्या परदेशी उपकरणाने अन्न शिजवतो? १० वस्तूंची नावे सांगतो. पण ओव्हन अन्न शिजवण्यासाठीच नाही, तर शिळे अन्न गरम करण्यासाठी, रेडी टु कुक मिळणारे अन्न ५ मिनिटात जेवण म्हणून तयार करण्यासाठीही वापरतात. त्यातून मूळ शेरामधले 'मिळेल ते गिळून घेणे' यामधला भाव तुमच्या बदलांमधून प्रतीत झालेला नाही, आणि शेराची वरची ओळ सपाट आहे. 'धीर जरा कर, समोर ये तू' पेक्षा 'पुढ्यात ये जर असेल हिंमत' कैकपट चांगले आहे. कारण मृत्यूला आव्हान देण्यातील मुजोर भाव तुम्ही मृत्यूला थेट विनंती करून (धीर जरा कर (ना रे बाबा, प्लीऽज छाप)) कोसळवला आहे. नाटकी भूल म्हणजे काय? मित्रच कशाला हवेत लुटालुटीसाठी? आधी तुम्हीच सुचवलेली 'मलाच ना पत्ता' ओळच इतकी छान होती, की या सगळ्याचे काही प्रयोजनच नाही. खरे तर मी ती ओळ स्वीकारलीही होती; नव्हे मूळ प्रतीत ती बदलूनही घेतली होती.
शेवटच्या शेराबाबत बोलत नाही; कारण मी स्वतः माझ्या मूळ शेराबद्दलच समाधानी नाही. तुमच्या बदलांबद्दल बोलायचे काही प्रयोजन उरत नाही.