मला वाटते हा लेख कुठल्याही काळात (म्हणजे सातवाहनापासून आत्तापर्यंत) चालून गेला असता कारण प्रत्येक पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा वेगळी असते. पहिल्या उदाहरणात तुमच्या भाचीचे कौतुक वाटते कारण तिचे उत्तर ल्याटरल थिंकींगचे उत्तम उदाहरण आहे.
आताचे जग वेगळे आहे. मी लहान होतो तेव्हा टीव्हीसुद्धा नव्हता. संगणकसुद्धा बीएसस्सीला आल्यानंतर पहिल्यांदा पाहिला. आताच्या मुलांना जन्मापासूनच हे सगळे उपलब्ध असते, साहजिकच त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये फरक असणारच. वाचनाचे म्हटले तर किती मोठ्या लोकांना वाचनाची सवय असते?
लहानपणी सर्व पाढे पाठ होते. आता फारच कमी. एकूणात पाढे पाठ करण्याचा काय उपयोग झाला माहित नाही.
मी पालक किंवा इतर कुठलीही भाजी नाही.
पण मुले जे शिकतात त्याचा त्यांना नक्की कोणता उपयोग होणार आहे याचा विचार व्हायला हवे असे वाटते. लहानपणी रोज एक नवीन सुविचारही शिकावा लागत असे. त्यातील बहुसंख्य सुविचार रोजच्या आयुष्यात निरुपयोगी आहेत. माझा फेवरिट : केस वाढवून देवानंद बनण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद बना.
(म्हणजे ब्रूस विलीस कट करावा की काय? )
हॅम्लेट