आपल्याला माझी कविता इथे पोस्ट करून काय साधायचे होते ते काही समजले नाही. त्यातही ठळक करून काय साधले ते समजले नाही. पण मजा आली. 'सकारात्मक चर्चेची अपेक्षा आहे' असे सांगताना भूमिका थोडीशी बदलली आपली! हरकत नाही.

आपल्या माहितीसाठीः मी आपल्या गझलेवर दिलेले प्रतिसाद माझ्या गझलेवर कुणी दिले असते तर मी हे म्हणालो असतो.

"मला आपल्या विचारांचा आदर आहे व माझ्या रचनेमुळे आपला रसभंग झाला यासाठी मी दिलगीर आहे".

तो भाग वेगळा!

( बाय द वे : माझ्या वरील कवितेतील एकही शेर 'ओव्हनसारखी' 'बातमी' नाही याचे माझ्याकडे समर्थन आहे - किंवा आपण उलट सिद्ध करावेत. )

मुळात आपण निर्मीती जगाच्या हवाली करतो तेव्हा कुठल्याही प्रतिसादासाठी तयार असण्याचा परिपक्वपणा असणे हे माझ्यामते आवश्यक आहे.

आणखीन एकः सुरेश भट या संकेत्स्थळावर जर आपण सहा/आठ महिनेपुर्वीपर्यंत पोहोचू शकलात तर आपल्याला माझ्या फारच गमतीदार रचना पहायला मिळतील. वृत्तच चुकले, सपाट विधाने, वर्णने, काय वाट्टेल ते! इथ पोस्ट करायचे असल्यास करू शकताच.

मात्रः आपण माझे प्रतिसाद वैयक्तिकरीत्या घेतलेत तसे मी करणार नाही. मी बोलायचे जहलेच तर फक्त याच गझलेवर बोलेन.

धन्यवाद!