राम ऐतिहासिक असावा. नसण्याचे काही कारण नाही. परंतु रामायण हे एक महाकाव्य आहे. त्यातील सर्वच गोष्टी जशाच्या तशा खऱ्या (उदा. चमत्कार इ. ) मानाव्या याचे कोणतेही कारण दिसत नाही. रामायणातील बालकांड आणि उत्तरकांड हे भाग नंतर घुसडले गेले असावेत असा अनेक तज्ज्ञांचा कयास असल्याने शंबुकाला बाजूला सारूया.
वाल्मिकिंचा राम हा मानवी आहे. त्याला सर्वसामान्य माणसासारखे राग-लोभ आहेत परंतु तरीही माणूस म्हणून त्याचे स्वतःवर नियंत्रण आहे. बऱ्या-वाईटाची जाणीव त्याला आहे. मोठ्यांचा आदर राखणे, प्रेमभाव मनात बाळगणे, आपल्या कर्तव्याला आपल्या स्वार्थापेक्षा अधिक महत्त्व देणे अशा अनेक गुणांनी तो श्रेष्ठ ठरतो. तो पुरुषोत्तम आहे का? असा प्रश्न असेल तर का नसावा? संसारात राहून त्याच्यापेक्षा दुसरा उत्तम पुरूष मला माहित नाही. (येथे संन्यासी गणलेले नाहीत. ) चू. भू. दे. घे.
वालीवध ही रामाच्या जीवनातील एक चूक मानायला जागा आहे. येथे रामाने फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिला कारण येथे त्याचे कर्तव्य आड येत नव्हते. वानरांच्या मदतीशिवाय सोकॉल्ड परमेश्वराचा अवतार रावणाला जिंकू शकत नव्हता. माणूस म्हणून रामाने शहाणपणाचा निर्णय घेतला.
वालीने त्यावर मरता-मरता शाप दिला की तुझी हत्या सुद्धा असाच कोणीतरी अकारण करील" असे सांगतात, की हा शाप रामाने पुढील अवतारात (कृष्ण जन्मात) भोगला. एका पारध्याने हरिण समजून बाण मारला, तो कृष्णास लागून त्याचा मृत्यू झाला.
हे आफ्टरमॅथ आहे. याचा लेखाशी फारसा संबंध नाही. ही सर्व कल्पक लेखकांची किमया.
यज्ञ म्हणजे प्रयोगशाळा होत्या.
मला असे काही वाटत नाही. यज्ञातून काहीतरी मिळवणे या सुरस गोष्टी आहेत.
असो, ऐतिहासिक राम आणि रामायणातील राम या व्यक्ती तंतोतंत सारख्या असाव्यात ही गल्लत असू शकेल. वाल्मिकिंनी पोएटिक लिबर्टी कोठे कोठे घेतली याविषयी मला विशेष कल्पना नाही.