रामाने जेव्हा वालीला मारले तेव्हा सीतेला रावणानेच नेले आहे आणि त्याच्याशी युद्ध करायचे आहे हे रामाला माहिती नव्हते .. कारण वालीवध केल्यानंतर सीतेचा शोध घेण्यात मदत करण्याचे सुग्रीवाने अश्वासन दिले होते. आणि सुग्रीव राजा झाल्यानंतर त्याने आपल्या मंत्र्याना/सैनिकांना सर्व दिशांना सीतेचा शोध घेण्यास पाठवले. (रावणाशी युद्ध करायचे आहे हे जर रामाला नक्की माहिती असते तर कदाचित रामाने सुग्रीव ऐवजी वालीचीच मदत घेतली असती कारण वालीने रावणाला युद्धामध्ये एकापेक्षा जास्त वेळा पराभूत केले होते).
वाली, सुग्रीव, हनुमान ही वानरे नव्हती तर त्या प्रदेशात राहणाऱ्या (आदिवासी? ) माणसांचीच जमात होती जे आपल्या जमातीतील माणसांना इतर जमातीतील माणसांपसून वेगळे ओळखण्यासाठी म्हणून वानरांचे मुखवटे घालत.