लेखातली उदाहरणे आवडली. प्रत्येक पिढी आधीच्या पिढीपेक्षा थोडी अधिक हुशार वाटते, कारण, हॅम्लेटाच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे नवनवीन उपकरणे, माहिती नव्या पिढीला लवकर उपलब्ध होते.
पण तरी, भारतातल्या शहरात राहणाऱ्या हल्लीच्या लहान मुलांना फारच अभ्यास असतो असे मलाही वाटते. मी नवव्या, दहाव्या इयत्तेत गेल्यावर एखादा तास सलग अभ्यास करू लागले. तोपर्यंत परीक्षेच्या आधी जरा पुस्तक चाळणे एव्हढाच अभ्यास असे. आता पहिलीपासून शिकवण्या असतात असे ऐकले आहे.
धडे, पाढे लहानपणीही पाठ नव्हते. पण कविता तरी पाठ असायला हव्या होत्या असे आता कधी कधी वाटते.