नमस्कार,
ज्या नागरिकांना मत नाही द्यायची त्यांच्यासाठी कलम ४९-ओ आहे. अधिक माहिती साठी इथ माहिती आहे - http://www.manogat.com/node/15965
त्याचा पूरेपूर उपयोग करून घेणे पण नागरिकांच्या हातात आहे.
१९९२ च्या आधी, भारताचे नागरिक जुन्या पद्धती ने मतदान करायचे. नंतर
इलेक्ट्रोनीक माध्यमाने मतदान करू लागलेत. मतदान करायचे असल्यास
इलेक्ट्रोनीक वोटींग मशीन चे बटण दाबून करू लागलेत. इथ पर्यंत ठीक. पण
समजा कुणाला मत नाही द्यायचे आहे तर काय?
वोट न करण्यास कुठलेच बटण नाही आहे.
म्हणचे
'क्ष' लोकांनी वोट दिलेत, तर प्रत्येकाला सही करावी लागेल. त्यातले एकानी
सही केली पण त्याला मतदान करायचे नाही. पण आता कुणी मतदान नाही केलं, हे
कळायला मार्ग नाही. 'क्ष' सह्या आणि 'क्ष-१' मतं!! आता ह्या क्षणी ह्या
मताचा दूरूपयोग होण्याची शक्यता आहे.
म्हणूनच रूल ४९-ओ आणण्यात
आला. ज्या नागरिकाला मतदान करायचे नाही, त्याला फोर्म १७-अ भरून
अधिकार्याला सोपवावे लागेल. ह्याचा एक रेकोर्ड राहील.
आता
ह्याच्या पलीकडे ह्याचा अजून एक चांगला उपयोग होवू शकतो. म्हणजे मतदान न
करण्यार्यांची संख्या ऊमेदवार्यांना मिळणार्या मतांपेक्षा जास्त असेल, तर
ते ऊमेदवार बाद. म्हणजे नवीन ऊमेदवारांना मार्ग मोकळा होईल. ह्या प्रकारे
चांगलेच ऊमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढेल. नागरिकांना 'हा ऊमेदवार
उभा राहण्याजोगा नाही' हे म्हणण्याचा हक्क प्राप्त होईल.
अमोल