कुठलाही विषय दिसला की त्यावर मत दिल्याशिवाय आम्हाला रात्री सुखाने झोप लागत नाही.
सारेगमप पाहिले नाही त्यामुळे त्यावर पास.
स्लमडॉगमुळे इतकी जळजळ का हा मोठा प्रश्न आहे. प्रत्येकाचे जळजळीचे कारण वेगवेगळे आहे. आता शेखर कपूरने एलिझाबेथ काढला तेव्हा टोपीकर असेच म्हणू शकला असता. त्यांची संस्कृती, त्यांची राणी. तिच्यावर चित्रपट काढणारा शेखर कपूर कोण? जर तो असे करू शकतो तर बॉइल्ससुद्धा धारावीवर चित्रपट काढू शकतो.
स्लमडॉग यशस्वी होण्याचे कारण म्हणजे शेखर कपूरनेच म्हटल्याप्रमाणे या चित्रपटाची वेळ आली होती. तो क्लिक झाला. याला अमेरिकेतील सध्याची परिस्थितीही कारणीभूत आहे.
हॅम्लेट