काय आदर्ष पालकत्व, मला माहित नाही. पण.... मुलांना योग्य वळण लावणेच, त्यांच्या मनांवर सदसद्विवेक बिंबवणे, त्यांना षडरिपुंपासून स्वतःचा बचाव शिकविणे, मनाला प्रसंगी आवर घालायला शिकवून इंद्रिये ताब्यातच ठेवणे शिकविणे आणि त्यांना शारिरीक शिक्षा मनापर्यंत पोचवायला मदत करणे, प्रसंगी सत्य, स्वाभिमान यातत्वांसाठी "ऑड मॅन आऊट " होण्यास मुळीच न कचरणे, हे सर्व वा अंशतः त्यात म्हणजे " आदर्ष पालकत्वात " नक्कीच बसत असावे.
मुलांना प्रोत्साहन देण्यापायी, लाचखोर बनवणे आदर्ष पालकत्वात / व्यवहार्य पालकत्वात मोडते का? हे तज्ञांना विचारायला हवे.
तुमचा मुद्दा हा " मुलांच्या चुकांचे व्यवस्थापन " या विषयानुरुप दिसतो. म्हणजे कॅरम सारखा " पहिला ड्यू माफ". त्याने चुकांची / दोषांची पुनरावृत्ती होण्याची वस्तुनिष्ठ शक्यता जास्त. म्हणून सध्या " पुनःगुन्हेगारांची [Recidivists ] कुटूंबातील / समाजातील संख्या जास्त. गुन्हेमानसशास्त्रज्ञांची मदत घेऊन हे सिद्ध करता येईल.
या उलट, "श्यामची आई" च्या काळी, " मुलांच्या चुकांचे /दोषांचे उन्मुलन" या व्यूहनिती वर आधारित कुटूंबव्यवस्था होती. त्यामुळेच प्रथम गुन्हेगारांची कुटुंबातील / समाजातील संख्या कमीच व पुनः गुन्हेगार संख्येने नगण्य. माझ्या घरी सुद्धा हीच रणनिती.
बाकी हॅम्लेटजी, मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आशा करतो की हा प्रतीसाद आपण पाल्याच्या दबावाखाली येवून लिहिला नाही.
धन्यवाद.