नुसते शीर्षक पाहून आधी वाटले काही कोडे वगैरे असावे. मग तुमचे नाव पाहिले तेव्हा वाटले काही वेगळे गंभीर असावे. मग एकदम जाणवले कुठं तरी काही तरी आठवल्यासारखं होतंय.
मग वाचत गेलो. एकेकीतून एकेक जण भेटत गेली. वास्तवात भेटलेलीच पुन्हा एकदा या निमित्ताने.
मग अमृता प्रीतम... आणि सारे काही आठवून गेले. आधी वाचलेल्या, इकडे-तिकडे फिरताना वास्तवात भेटलेल्या त्यांच्या लेखनातील प्रतिमा. मग एकदा कोणाशी तरी घातलेला वाद आठवला. अमृता प्रीतम यांचे हे लेखन प्रतिकात्मक किंवा प्रातिनिधीक सुद्धा कसे म्हणता येईल? हे तर वास्तव. केवळ वास्तव!!!
सारे आठवले. यापलीकडे नवे शब्द मात्र मृदुला वगैरे म्हणतात तसे सुचलेच नाहीत. हीही या मूळ लेखनाची आणि अनुवादाची ताकद.