१)कवितेत काहीतरी काव्य असले पाहिजे. >>म्हणजे नक्की काय? सोदाहरण सांगाल का? आवडेल मलाही ऐकायला
माझी नम्रपणे सादर केलेली रचना! ( कृपया शहाणपणा समजू नयेत. फक्त आपण विचारलेत म्हणून येथे देत आहे. )
रम्य तळे फुललेली कमळे वनराई, बागडती पक्षी
चित्र जरी सुंदरशी नक्षी तळे खरे नसतेच ते तळे
वर्षभराचा पाउस साचे रूप तळ्याचे लेत मोहवी
मखमल हिरवळ ताल धरे पाखरे मधुरसे सूर ऐकवी
ऊन पाहता वेडावुन हे तळे वाफ होत घे भरारी
पाउस होत पुन्हा येते अन चित्र देखणे पुन्हा चितारी
अशीच माझ्या सभोवताली चित्र रेखते त्यागातुन मी
वाफ कधी पाऊस कधी पण कुणास ना कळते आतुन मी
२) माझ्यामते निसर्गवर्णन हा जरी कवितेचा विषय घ्यायचा असला तरीही फक्त निसर्गातील विविध छटा लिहून कविता सशक्त होते असे नाही.>>नाही हो नुसतंच निसर्गवर्णन करण्याची वेळ अजून माझ्यावर नाही आली.
माफ करा, माझी समजण्यात चूक झाली असावी. माझे मत इतकेच आहे की कवितेतून एक कवीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्टपणे समोर यावा व त्यानंतर रसिकांनी त्यांना भावेल तो अर्थही लावावा. आपल्या रचनेतून अजूनही मला आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट होत आहे असे वाटत नाही. पण तो बहुधा माझ्या आकलनक्षमतेचा प्रॉब्लेम असावा.
३) प्रतिमा असाव्यात. हं! हा निष्कर्ष बरोबर.
इथे जर एखाद्या सासरच्या जाचाला कंटाळलेल्या स्त्रीला 'तळे' समजए तर तिचा भाऊ आल्यावर तिला कधी एकदा सुटतोय अन माहेरी जातोय असे वाटेल>>> जवळपास आहात. पुलस्ती म्हणालेतच, एक मन, एक स्वतंत्र अस्तित्व म्हणून विचार करून बघाल?
अवश्य, पुन्हा सांगतो, कदाचित मी वाचण्यात व आस्वाद घेण्यात चूक केली असावी.
४) तळ्याला मन>> मेरा मन तळं तळं होगया की हो हे वाचून
कृपया राग मानू नये.
५) तळे अन साचलेला पाऊस सोडले तर या रचनेत आकर्षणाची स्थळे कमी आहेत असे म्हणावे लागेल>>>आवर्जून प्रामाणिक मत दिलंत त्याबद्दल मनः पूर्वक धन्यवाद :)
आपल्या उपरोधिक 'स्माइली'चाही धन्यवाद!