शेवट सुंदर,

पण काही गोष्टी कळल्या नाहीत.

लाचारपणाचा कणा वाकता आहे
मी पराजयाचा 'पाय काढता' आहे

यात "मी पराजयाचा" ने नक्की काय सूचित करायचे आहे? 'मी' आणि काढता यांचा अन्वय नीटसा लागत नाही.

मी सजीवतेचा 'हात मारता' आहे इथेही तसेच.

हा पूल करावा पार, मला भेटावे
पण मोहनदीचा जोर वाढता आहे ही कल्पना सुंदर आहे, पण यातही 'मला' म्हणजे नक्की कोणाला? आणि 'पूल' पार करण्यात मोहनदीचा जोर वाढता असला तरीही काही अडचण न यावी, तुम्हाला इथे 'पूर' असे म्हणायचे आहे का?

खूपच प्रश्न विचारलेत मी, क्षमस्व !