निशदेराव,
आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा यत्न करतो. पटतीलच असे नव्हे.
१. भारतानेच रामास राजा होण्याचा आग्रह केला होता हे खरे. किंबहुना दशरथ आणि आयोध्येतील बऱ्याच लोकांना तसेच वाटत होते. दशरथाने, केवळ आगतिकतेपोटीच रामाला वनवासात पाठवले हे ही खरे! दशरथ स्वतः वचनात गुंतला होता; त्याचे वचन निभावण्याची नैतिक जबाबदारी रामाने स्वेच्छेने स्वीकारली होती. पण प्रत्यक्षात ती पार पाडताना "स्वतः राजा न होण्याचे" वचन त्याने पाळले नाही.
२. वालीवधासंबंधात सांगायचे तर, राम - त्याच्या पत्नीस पळवले गेल्याने अतिशय अस्वस्थ होता. त्याचे विवेकाचे भान सुटले होते. सुग्रीवाकडून येन-केन प्रकारे मदत मिळवायचीच या विचाराने पछाडला होता. त्याने अधिक विचार न करताच वाली वधाचे काम (सुपारी) पत्करले. तत्क्षणी मित्रता हा विषय दोघांच्या ही पुढे नव्हता. सुग्रीवाला रामाच्या क्षमतेविषयी अद्याप खात्री ही नव्हती.
३'शंबुक पूर्वजन्मी शंबू नावाचा दानव होता. पार्वतीच्या शापामुळे त्याचा शुद्र घरी जन्म झाला व शापमुक्त होण्यासाठी त्याला रामाच्या हातून मरण आले.' काही तरी लटके समर्थनन; बाकी काहीच नाही!