राम हा देव की माणूस अशा शंकांपेक्षा रामाची उपासना(उप+आसना, यातील ध्वन्यार्थ अवलंबिला पाहिजे) करून पहा.
चित्तवृत्ती शांत करून मनन करा.
तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
राम ही अनुभवण्याची गोष्ट आहे.
चहाबरोबर गप्पा मारण्याची नव्हे.
कोणत्याही गोष्टीवर प्रतिपादन करावयाचे तर तिचा अनुभव आवश्यक आहे.
चहा कसा झाला हे सांगण्यासाठी तो पिऊन पाहण्याची गरज आहे.
म्हणून राम कोण, कसा होता हे जाणण्यासाठी रामाची उपासना केली पाहिजे.
फक्त एकदा वा दोनदा रामायण वाचून, तेही मराठीत अनुवादित, रामाविषयी मत प्रदर्शन करणे चुकीचे आहे.
एकंदरीत १९ प्रकारच्या रामायणाच्या संहिता उपलब्ध आहेत. कमीत कमी वाल्मिकी रामायण, अध्यात्म रामायण आणि योगवासिष्ठ महारामायण तरी वाचून पहा. (संस्कृत आणि मराठी दोन्ही)
एकाच जीवनात अनंत भूमिका दुसरयाच्या मनाप्रमाणे वठवणारा राम पुस्तके वाचून समजणारा नाही.
ह्या सर्व शंका मी स्वतः अनेक साधूंना, संताना आणि रामायणाच्या गाढ्या अभ्यासकांना विचारल्या होत्या.
दुर्दैवाने कोणीही त्याचे समर्पक उत्तर दिले नाही.
तेव्हा गुरुदेवांनी मला रामचिंतन करण्यास सांगितले. त्यानंतर या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित आणि आपोआप मिळाली. (हे कदाचित पटणार नाही. जिथे मन, तर्क, बुद्धी, विचार, शब्द, अहं संपतात तिथे परमेश्वर प्रकट होतो- "यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह").
म्हणून तुम्हालाही राम कळून घ्यायचा असेल तर तुम्ही राम चिंतन/ मनन/निदिध्यासन करा.
राम तुमच्या सर्व शंका निश्चितच दूर करेल.
जय जय रघुवीर समर्थ ॥