रावणाला एक पत्नी नव्हती. असा प्रश्न विचारणे त्याच्यासारख्या लंपटाचा अपमान ठरू शकेल.
काही ढोबळ पुरावे देते. आता संदर्भ हाताशी नाहीत. चू. भू. दे. घे.
१. रामायणातील युद्धात रावणाच्या अनेक मुलांचे संदर्भ येतात. त्यापैकी आठवणारी काही - इंद्रजीत, प्रहस्त, अक्षयकुमार इ.. या सर्वांची आई मंदोदरी नव्हती हे आठवते (पण इतर बायकांची नावे आत्ता आठवत नाहीत. तशी पोरं व्ह्यायला रावणाला लग्न करायचीच गरज नाही म्हणा. त्या नियमाने तो एकपत्नीव्रत ठरू नये असे वाटते. )
२. हनुमान लंकेत गेला असता सीतेला शोधण्यासाठी त्याने रावणाचे जनानखाने (राणीमहाल) पालथे घातले पण त्याला तेथे सीतेप्रमाणे कोणी दिसले नाही असा संदर्भ रामायणात येतोसे वाटते. चू. भू. दे. घे.
३. वेदवती (जी पुढे सीता म्हणून जन्मली) आणि कुबेराची सून रंभा (पर्यायाने रावणाचीही सून) या दोघींवर रावणाने बळजबरी केल्याचे दिसते.
बहीणीच्या अपमानाचा सूड म्हणून रावणाने सीतेला पळवले यावर विश्वास ठेवू. पण ते क्षम्य कसे ठरते बॉ? रावणाने सीतेला केवळ पळवून बंदी बनवले असते तर कदाचित, समजण्यासारखे आहे पण तसा त्याचा हेतू नव्हता हे स्पष्ट आहे. रावणाला सीतेचा उपभोगही हवा होता. परस्त्रीच्या इच्छेविरुद्ध तिचा उपभोग अक्ष्यम्य असायला त्याकाळातही हरकत नसावी. :)