श्री फणसे साहेब,

मी आपल्या रचना व अभ्यास या दोन्हींचा मनापासून आदर करतो. मात्र:

मला खरच फार वाईट वाटले. आपल्याला असे का वाटावे की 'मीर' सारखा माणूस प्रेयसीच्या मादक व नशील्या डोळ्यांवर एक शेर रचून शांत बसेल? तिच्या गुलाबाच्या पाकळ्यांसारख्या ओठांवर एक द्विपदी रचेल? असेच असते तर 'शबाब सारखा काफिया मीरने का सोडला असता?

अन ते सुद्धा इज्तिराब, सराब असे शेर रचल्यावर मध्येच ?

आपण सुरेशभट या वेबसाईटवरील 'अशी गोड तू' ही रचना वाचली असल्यास, आपण मीरच्या शेरांचे 'दिसणारे' जे अर्थ लावून समाधानी झाला आहात हे पाहून असे वाटते की आपण मीरला अशी गोड तू च्या रचनाकर्त्याच्या पंक्तीत बसवत आहात.

मतल्याचा तर आपण जो अर्थ लावला आहेत तो एक विनोदच म्हणावा लागेल.

तो शब्द 'शराब' असा नसून 'सराब' असा आहे ज्याचा अर्थ आहे मृगजळ!

आपण शराब शब्द समजून मद्यासारखे दर्शन आहे म्हणून मोकळे झालेला दिसता.

कृपया विनोद करू नयेत.

धन्यवाद!