लेख केनेडी स्पेस सेंटरची व्यवस्थित माहिती करून देणारा आहे. आवडला. ह्या ठिकाणाला भेट देण्याचा योग आलेला नाही, पण तो आणायला हवा असे लेख वाचून वाटले. नासाच्या ह्युस्टनजवळच्या सेंटरला भेट दिली आहे, पण अर्थातच तिथे उड्डाण पॅड वगैरे नाही, त्यामुळे इथली भेट जास्त रोमहर्षक असणार ह्यात शंका नाही.
लेखनशैलीही चांगली आहे.
अवांतर - स्वयंसुधारणा चालू नव्हती का? अनेक ठिकाणी शुद्धलेखनातील अतिशय ढोबळ चुकाही तश्याच राहिल्या आहेत. शुद्धिचिकित्सक वापरायला हवा होता. वाक्यरचनाही अनेक ठिकाणी सदोष वाटली. काही ठिकाणी इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी प्रतिशब्द वापरणे सहजशक्यहोते असेही वाटले. अर्थात त्याने रसभंग असा झाला नसला तरी पुढील लेखनात ह्याचा विचार जरूर व्हावा ही विनंती.