लेखाच्या मांडणीबाबत मात्र मी वरील मतांशी सहमत नाही.
हरकत नाही.
कदाचित माझी समज कमी असल्यामुळे असेल...
असे आधीच क्वॉलिफिकेशन टाकू नका. मुळात ते तसे असेल असे मला वाटत नाही. पण हे क्वॉलिफिकेशन वास्तव मानायचे झाले तर पुढच्या वाक्यांना अर्थ रहात नाही आणि चर्चाच खुंटते.
पण मला अनेक वाक्यात संदिग्धता जाणवली आणि नेमके काय म्हणायचे आहे हे नीटसे समजले नाही असे वाटले...
संदिग्ध वाक्ये दाखवा, ती तशी का आली हे पाहता येईल.
काही ठिकाणी उल्लेख फार त्रोटक आणि म्हणून समजावयास अवघड वाटले.
याही जागा नेमक्या दाखवल्यात तर आवडेल.
ही चर्चा येथेच करणेही आवडेल.
(हा प्रतिसाद हलके घेऊ नये, पण तो तुमच्या प्रतिकूल प्रतिसादावर चिडून आलेली प्रतिक्रियाही मानू नये. कारण प्रतिकूलता हाही या देवाणघेवाणीचाच एक भाग असतो, हे तुम्हालाही मान्य आहेच.)