अनेक शब्द प्रशासकीय वापरात असतीलही आणि बरेच केवळ तिथेच असतील. काही माझ्या ओळखीचे होते, काही नव्हते. फाईल साठी नस्ती हा शब्द आणि डेटासाठी न्यास हा शब्द पूर्वी वा प्रशासकीय वापरात होता/आहे हे मला माहीत नव्हते. काही शब्द मला आवडले. मराठीतील परकीय शब्द काढण्याच्या दृष्टीकोनातून वकील, कैदी वगैरे आता मराठीत रुळलेल्या शब्दांसाठीही संस्कृतप्रचूर शब्द आढळले. आता तसे करावे की नाही हा वाद वेगळा, पण अनेक शब्दांचा वापर रोचक वाटला.