आज समाजात राम हा आदर्श पुरुष म्हणून ओळखला जातो. आदर्शाचे अनुकरण करण्याकडे कल असतो. तेव्हा आपले आदर्श तपासून पाहणे योग्यच नव्हे काय?

आदर्श ठेवला आहे असे म्हणणे आणि प्रत्यक्ष त्या आदर्शाप्रमाणे वागणे ह्यात फरक आहे. सामान्य माणसाला व्यवहार समजतोच. रामाला तो आदर्श म्हणत असेलही आणि कित्येक गोष्टी तो व्यवहारात तशा करत नसेलही. त्याला रामाला आदर्श म्हणायचेही स्वातंत्र्य आहे आणि त्याप्रमाणे वागण्याचे वा न वागण्याचेही स्वातंत्र्य आहे. बोलण्यावागण्यात अंतर हे व्यवहारात असणे गैर नाही. (अंतर असू नये ... असे नीतिशास्त्रात म्हणायला ठीक असले तरी.) माणूस जसा 'आहे' तसा 'आहे'! तो अमूक 'असायला हवा' असे म्हणण्याचा अधिकार कोणाला?

एकीकडे रामाला आदर्श म्हणण्यात तोट्याचे/चुकीचे काही नाही आणि व्यवहारात बसेल तेवढेच वागणे ह्यातही तोट्याचे/चुकीचे काही नाही. सामान्य माणूस कमीत कमी अवरोधाचा मार्ग स्वीकारणारच. त्याला चुकेचे म्हणता येणार नाही.

उदा. मी स्वतः रामाला आरर्श मानणाऱ्यांपैकी आहे तरी वडिलांनी सांगितले म्ह्णून मी सगळे हक्क सोडून गेलो असतोच असे नव्हे. मी जेव्हा वचन देतो तेव्हा व्यवहारात बसेल तेवढे पाळतो हे अध्याहृत असणारच. (आणि तरीही राम आदर्श आहेच. त्या आदर्शापर्यंत मला पोचता येवो न येवो.)