राम ऐतिहासिक असावा. नसण्याचे काही कारण नाही. परंतु रामायण हे एक महाकाव्य आहे.

हिंदू धर्माच्या आणि धर्म मानणाऱ्याच्या दृष्टीने रामायण किंवा महाभारत श्रद्धेय आहे. पण ऐतिहासिकदृष्ट्या रामायणाला किंवा महाभारताला फारसे महत्त्व नाही. सम्राट अशोकाचे ऐतिहासित्व सिद्ध करण्यासाठी अनेक स्रोत आहेत. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जागोजागी मिळालेले वेगवेगळ्या भाषांतले, लिपींतले ताम्रपट आहेत, शिलालेख आहेत. ह्याशिवाय काही गोष्टींची पडताळणी करण्यासारखी महावंश आहे, दीपवंश आहे. पण सध्यातरी रामाबाबतीत  असे म्हणता येणार नाही. असो.

चर्चा एकंदर चांगली चालली आहे.

१. पुराणातल्या कथा, किस्से, माहिती ह्यांचे ऐतिहासिकत्व अगदी शंका घेण्यासारखेच असते. पुराणातली वांगी असे आम्ही उगाच म्हणत नाही. पण पुराणात मौर्यांची दिलेली वंशावळ, सनावळ इतर स्रोतांपेक्षा अधिक अचूक मानली जाते. (रोमिला थापर ह्यांच्या अशोक अँड द डिक्लाइन ऑफ मोर्याज ह्या पुस्तकाच्या आधारे)