आहेत ना. अडचण तर तिथेच आहे. ते शब्द कोशातच राहिले, फारतर कोशाची सीमा ओलांडून पाठ्यपुस्तकात आले. तेथून मनामनांत येईपर्यंत जगणे पुढे सरकले. आणि मग जे झाले त्यात साऱ्याचीच वाट लागली असावी.
वरच्याच शब्दांपैकी 'अप्रकट" हा तसा इन कॅमेरासाठी सोपा शब्द. वरकाम हाही सोपा शब्द. अभिलेख, प्रतिभूती, काटपुरावा, वचनपत्र असे इतर शब्दही रुजायला काही हरकत नव्हती. पण नाही...
या शब्दकोशांच्या एकूण किती प्रती शासनाने काढल्या आणि त्या कुठे गेल्या हे एकदा बघावे लागेल (आता हे धनुष्य कुणी पेलावे?) बहुदा त्या सगळ्या सरकारी अनुदानलक्ष्यी ग्रंथालयांमध्ये जाऊन पुढे रद्दीच्या मार्गी लागल्या असतील. दैनंदिन वापरातील शब्दांचा एक सर्वसाधारण कोश काढून तो दहावी आणि त्यापुढच्या विद्यार्थ्यांमध्ये सवलतीत, समजा पाच ते दहा रुपयांत, वाटण्यास काहीही हरकत नव्हती. पण...