आतापर्यंतची चर्चा वाचून मला वाटते एकंदर विवादकांची चौपदर्री विभागणी करावी

१. रामाचे व्यक्तिमत्व ऐतिहासिक आहे आणि आदर्श आहे असे मानणारे.

२. रामाचे व्यक्तिमत्व ऐतिहासिक आहे पण आदर्श नाही असे मानणारे.

३ रामाचे व्यक्तिमत्व ऐतिहासिक नाही पण आदर्श आहे असे मानणारे.

४. रामाचे व्यक्तिमत्व ऐतिहासिकही नाही आणि आदर्शही नाही असे मानणारे.

मला वाटते मूळ प्रस्तावक क्रमांक २ ह्या कप्प्यात येतात.

अशा प्रकारे आपल्या मताची विभागणी केली तर कळणे सोपे होईल असे मला वाटते.