शब्दही रुजायला काही हरकत नव्हती. पण नाही...
नुसते दीपस्तंभ आणि निर्दोष होकायंत्रे असण्याने जहाजाला वादळाला तोंड देत मार्ग काढायला पुरेसे पडत असेल असे वाटत नाही. त्यासाठी कटिबद्ध सुकर्णधार असायला हवा.
असो.
शासनाने कोश प्रकाशित करून आधारभूत शब्दसंग्रह निर्माण करण्याचे काम केलेले आहे. (त्यात सुधारणा होऊ शकतील) त्यातले शब्द आपण आपल्याला जमेल त्याप्रमाणे उपयोगात आणत गेल्यास परिणाम निश्चितच होईल असे वाटते. (सकाळ सारख्या वृत्तपत्रांतून अग्रलेखांमध्ये, महत्त्वाच्या लेखांमध्ये कित्येकवेळा असे शब्दप्रयोग वापरलेले असतात हे आपण पाहिलेले असेलच.)