(मनो)रंजक चर्चा.
१. इतिहास या शब्दाची व्याख्या काय?
२. आदर्श म्हणजे काय? त्याचे मापदंड आजच्या समाजव्यवस्थेतील गृहीत धरायचे की, त्या काळच्या? पुन्हा येथे तो काळ म्हटले तर त्यातील मापदंडांसाठी पुरावे काय?
३. त्या काळाला ऐतिहासीक मानावयाचे झाले तर संस्कृतमधील त्या मूळ काव्याचे अर्थ नेमके कसे लावावेत? पाणिनीचा आधार घेऊन की आणखी काही? तो आधार घेतला तर काही अर्थ हे आजच्या संदर्भातून विचार केला तर भयंकरच निघतात हे खरे?
४. रामायण प्रमाण कोणते मानायचे?
५. पृथ्वीच्या या भागात गणसमाज होता आणि त्यातून पुढे हितसंबंधांच्या संघर्षांतून (त्यालाही एक पदर स्त्री विरुद्ध पुरूष अशा हितसंबंधाच्या संघर्षाचा आहे असेही म्हणतात) आजच्यासारखा समाज आला अशी उत्क्रांती मानली जाते हे खरे असल्यास तेव्हाच्या मानवी सामाजिक व्यवस्थेची उत्क्रांती किती झाली होती? म्हणजे, आजच्या समाजव्यवस्थेचा मागचा कोणता स्तर त्यावेळी होता?
६. सीता म्हणजे भूमी असाही एक अर्थ आहे हे खरे का? सीता म्हणजे भूमिकन्या या अर्थाने केलेला हा प्रश्न नाही. सीता म्हणजे मालमत्ता या अर्थी जमीन या अर्थाने केलेला हा प्रश्न आहे. संस्कृततज्ज्ञांनी खुलासा करावा.
७. हनुमानाने लंकेत गेल्यावर सीतेला आपली रामाचा दूत ही ओळख पटवून देण्यासाठी ज्या काही खाणा-खुणा सांगितल्या होत्या त्या कोणत्या?
८. रामाने सीतेशी वनवासात संग केला नाही याचा आधार केवळ त्यांना अपत्ये झाली नाहीत हाच आहे की आणखी कोणता? संग करूनही अपत्ये न होण्यामागे त्या काळीही गर्भनिरोधक आणि गर्भनिःपातक द्रव्यौषधी वगैरे होती असे तर नाही? संजीवनी असलेला काळ तो...
९. गझलेचे गायक भीमराव पांचाळे आहेत. रचनाकार वेगळेच. बहुदा इलाही जमादार.
१०. चित्तराव, मौर्यांची वंशावळ पुराणात? मी रोमिलांचे ते पुस्तक वाचलेले नाही. कोणते पुराण वगैरे उल्लेख आहे का?
चर्चेचा निष्कर्ष काय असेल? असो...